Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांचा हलगर्जीपणा पडला सामान्य नागरिकांना महाग; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

Maratha Reservation | पुणे: गेल्या महिन्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा सुरू केला होता.

त्यानंतर राज्य शासनाने केलेल्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती.

परंतु, सरकारने यावेळेत काहीच केलं नाही. त्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झालेला असून त्यांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलं आहे.

आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीची या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरू आहे. अशा पुणे शहरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.

ST buses going to Marathwada from Pune cancelled over Maratha reservation

मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणावरून (Maratha Reservation) तीव्र आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहे.

अचानक बसेस रद्द केल्यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगली तारांबळ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक प्रवासी खासगी वाहनांनी मराठवाड्याकडे जात आहे तर अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे.

मराठा समाजाचं (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस पेटत चाललं आहे. तरी देखील राज्य सरकार फक्त आश्वासन देत असल्याच्या चर्चा सुरू आहे.

अशात शिंदे-फडणवीस सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांना अजून काय काय बघावं लागणार आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, मराठा समाजाने आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंदोलन तीव्र आंदोलन करत आहेत.

राज्यात बऱ्याच ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेसवर असलेल्या जाहिरातींवरील नेत्यांच्या फोटोला मराठा आंदोलकांनी काळ फसलं आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे बस स्थानकावरून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे प्रवाशांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.