Weather Update | राज्यात कुठं थंडीची चाहूल तर कुठं पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात उन्हाची तीव्रता कमी होत असून थंडीची चाहूल लागायला लागली आहे.  परंतु, राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरात सकाळी हवेत गारवा असला तरी दुपारी नागरिकांना उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Marathwada, Vidarbha and Madhya Maharashtra are getting colder day by day

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे. या ठिकाणी दुपारचे तापमान ३३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविण्यात आले आहे.

तर दुसरीकडे नागपूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये देखील थंडीची चाहूल लागली आहे. गुलाबी थंडी वाढत असल्यामुळे कमाल तापमानात (Weather Update) घट होताना दिसत आहे.

तर येत्या काही दिवसांमध्ये किमान तापमानात देखील घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर शहराचे कमाल तापमान 15 अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

तर जळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात एकीकडे थंडीची चाहूल लागत असताना राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची चाहूल लागली आहे. तर कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

येत्या 48 तासात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली (Weather Update) आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe