Share

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? CM शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात फोनवर चर्चा

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. दिवसेंदिवस मराठा समाजाचं आंदोलन तीव्र होत चाललं आहे. काल राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) … Read more

Published On: 

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. दिवसेंदिवस मराठा समाजाचं आंदोलन तीव्र होत चाललं आहे.

काल राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात आज मराठा आरक्षणाबाबत फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

Manoj Jarange and Eknath Shinde had a phone discussion about Maratha reservation

राज्यामध्ये सुरू असलेलं मराठा समाजाचं आंदोलन (Maratha Reservation) हिंसक वळण घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर तब्बल 24 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आपली तब्येत जपण्याचा सल्ला दिला आहे. तर मराठा समाजाला अर्धवट आरक्षण (Maratha Reservation) नको असं मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं आहे.

त्याचबरोबर या फोननंतर मनोज जरांगे यांनी आजपासून पाणी पिण्याची तयारी दर्शवली आहे. आतापर्यंत मनोज जरांगे यांना अनेक नेत्यांनी त्यांना फोन केला आहे.

जरांगे दरवेळी प्रत्येक नेत्याचा फोन लाऊडस्पीकरवर टाकून प्रसार माध्यमांना ऐकवत होते. परंतु, आज झालेला मुख्यमंत्र्यांचा फोन मनोज जरांगे यांनी लाऊडस्पीकरवर टाकलेला नाही.

त्यांनी त्यांचा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा संवाद अद्याप उघड केलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्की काय चर्चा झाली असेल? याबाबत आता तर्क वितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही