🕒 1 min read
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध गंभीर आरोप झाले असून, त्यात विशेषतः नणंद करिश्मा हगवणे हिचं नाव पुढे आलं आहे. ‘पिंकीताई’ नावाने ओळखली जाणारी करिश्मा ही वयाची ३४ वर्षांची असून अजूनही अविवाहित आहे. मात्र, हगवणे कुटुंबातील प्रत्येक निर्णयावर तिचा प्रभाव होता, असं सांगितलं जातं.
करिश्मा ही फॅशन डिझायनर असून ‘लक्ष्मीतारा’ नावाने स्वतःची कंपनी चालवते. ती पालकांसोबत मुळशीमधील घरी राहत असून, घरातील वातावरण आणि सदस्यांवर ती नियंत्रण ठेवायची. मोठी सून मयुरी जगताप हिनंही याबाबत गंभीर आरोप करत सांगितलं की करिश्मानं केवळ वैष्णवीलाच नव्हे, तर तिचाही मानसिक आणि शारीरिक छळ केला.
Who is Karishma Hagawane?
मयुरीच्या म्हणण्यानुसार, करिश्माने वैष्णवीला तिच्याशी बोलू देणंही बंद केलं होतं. याच प्रकारामुळे वैष्णवीला अडचणीत आणलं गेलं आणि ती मानसिकदृष्ट्या खचली. तसेच, मयुरीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पोलिसांत तक्रार दिली होती, मात्र राजकीय दबावामुळे ती दुर्लक्षित झाली, असा तिचा आरोप आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं दहा महिन्यांचं बाळ सध्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाकडे आहे. बाळाच्या ताब्यादरम्यान कस्पटे कुटुंबाला धमकीही मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” – वाचा राजेंद्र हगवणेंचं धक्कादायक उत्तर!
- “कर्तव्य पार पाडलं असतं तर चिडचिड झाली नसती!” – रोहिणी खडसेंचा चाकणकरांवर घणाघात
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











