Walmik Karad । मागील काही दिवसांपासून केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू लागले आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. (Santosh Deshmukh case)
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असणारा वाल्मिक कराड देखील आहे.
“एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता,” असे कॅप्शन संजय राऊत यांनी फोटोला दिले आहे.
Sanjay Raut on Walmik Karad
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सुरुवातीपासूनच संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून ते सतत राज्य सरकारची कोंडी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या संजय राऊत यांनी ट्वीट केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :