HMPV । कोरोना नंतर सध्या चर्चेत असणारा घातक आजार म्हणजे HMPV. हा एक वेगाने पसरणारा विषाणू (HMPV Virus) असून ज्याची आता महाराष्ट्रात एंट्री झाली आहे. या घातक आजारामुळे देशासह राज्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. हा आजार शरीराच्या कोणत्या भागावर अटॅक करतो? याची अनेकांना माहिती नाही.
हा आजार सर्वात अगोदर फुफ्फुस आणि वायुमार्गांवर निशाणा साधून श्वसन प्रणालीच्या पेशींना नुकसान पोहोचवतो. असे झाले तर श्वास घेण्यात अडचण येते. प्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये देखील हा विषाणू झपाट्याने पसरत जातो. या आजाराची लक्षणे वेळीच ओळखले पाहिजे.
HMPV symptoms
जाणून घ्या लक्षणे
सर्दी, ताप खोकला, तसेच घसा खवखवणे अशी लक्षणे जाणवू शकतात. काही प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.
सर्वात जास्त धोका कोणाला?
फुप्फुसांचा संसर्ग तसेच दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना या आजाराची गंभीर लक्षणे जाणवण्याची शक्यता आहे. तसेच काही लोकांमध्ये न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायलाइटिससारखी घातक लक्षणे दिसू शकतात.
HMPV Virus Causes Treatment
उपाय
सध्या तरी या आजारावर कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. अनेकजण विश्रांती आणि हायड्रेशनने बरे होत आहेत. तुम्हाला या आजारापासून वाचायचे असेल तर मास्क घालणे, हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे व रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :