Anjali Damania । सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन ( Santosh deshmukh murder case ) राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात सवाल उपस्थित केले आहेत. अशातच त्यांनी वाल्मिक कराडबाबत देखील आता मोठा खुलासा केला आहे.
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोशल मिडियावर कागदपत्र शेअर केली असून बीडमधील वाईनच्या दुकानांसंदर्भात त्यांनी आरोप केले आहेत. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज सकाळी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांना एक गोपनीय पत्र मिळाल्याचं म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, “एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलं. या पत्रात लिहिलं आहे की, समाजसुधारक वाल्मिक कराड (Walmik Karad) यांची केज, वडवनी, बीड आणि परळी इथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत. या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव पाच कोटी इतका आहे. ही जमीन केज येथे 1 कोटी 69 लाखांना 29 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली. तीन दिवसांत याला परवानगी दिली गेली. वास्तविक जमिनीचा सातबारा 15 दिवसांनंतर होतो. पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवण्यात येतात याचं हे उदाहरण आहे.”
महत्वाच्या बातम्या :