Suresh Dhas । बीडच्या मस्साजोगचे सरसपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) हे देखील सहभागी झाले आहेत. आजच्या आंदोलनात बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.
Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder Case
ते म्हणाले, “कितीही वेळ जाऊ द्या, संतोष देशमुख यांना मनातून उतरू देऊ नका. कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळून देऊ.” त्याबरोबरच आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे”, अशी मागणी यावेळी सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले