🕒 1 min read
Govinda । बॉलिवूड अभिनेता गोविंदा सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. त्याचे चित्रपट आजही तरुणाईला भुरळ पाडत आहे. अनेक हिट चित्रपट त्याच्या नावावर आहेत. पण सध्या गोविंदा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे तर चर्चेत आला आहे. याबाबत पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. (Govinda’s Divorce Rumors)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने (Sunita Ahuja) सांगितले की, ती अभिनेत्यापासून वेगळी राहते. आमच्याकडे दोन घरे असून ती मुलांसोबत फ्लॅटमध्ये तर गोविंदा अपार्टमेंटसमोरील बंगल्यात राहतो. ती पूर्वी तिच्या लग्नात सुरक्षित होती, पण आता तिला तसे वाटत नाही.
“गोविंदा नेहमीच कामात व्यस्त असल्याने त्याच्याकडे रोमान्ससाठी वेळ नसतो. त्यामुळे मी त्याला सांगितले आहे की माझ्या पुढच्या आयुष्यात तो माझा नवरा होऊ नये. इतकेच नाही तर तो सुट्टीवर जात नाही. मला गोविंदासोबत बाहेर जाऊन रस्त्यावर पाणीपुरी खायची इच्छा आहे. आम्ही दोघे चित्रपट पाहायला गेलो असल्याचा मला असा एकही प्रसंग आठवत नाही,” असे सुनीता अहुजाने सांगितले.
Govinda’s Divorce Rumors
गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, या जोडप्याचे खूप मजबूत नाते असून त्यांचे लग्न 11 मार्च 1987 रोजी झाले होते. त्यांना टीना आहुजा आणि यशवर्धन अशी दोन मुले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही अनेकदा टीव्ही शोमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत पाहायला मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या :
- Instagram आणि YouTube मधून पैसे कामवायचेत? कुठं करता येईल बक्कळ कमाई? जाणून घ्या गणित
- Health tips। तुम्हालाही असतील ‘या’ सवयी तर सोडाच, नाहीतर जीव येईल धोक्यात
- बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, “मास्टरमाईंडला…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










