Irfan Khan । सध्या बॉलिवूड (Bollywood) मध्ये अनेक अशा लोकप्रिय अभिनेत्री आहेत ज्यांनी हिंदू असूनही दुसऱ्या धर्माच्या अभिनेत्यांशी लग्न केले आहे. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता होता जो आपल्या हिंदू गर्लफ्रेंडसाठी धर्मांतर देखील करायला तयार होता. पण त्या दोघांनी धर्मांतर न करता लग्न केलं.
या अभिनेत्याचं नाव आहे इरफान खान. आज या अभिनेत्याचा 58 वा वाढदिवस (Irfan Khan Birthday) असून त्याचे 29 एप्रिल 2020 रोजी ट्यूमरमुळे निधन (Irfan Khan death) झाले. त्याचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ (Angrezi Medium) होता. विशेष म्हणजे हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. तसेच त्याने शेक्सपियरच्या कादंबरीवर आधारित मकबूल, हासिल, हिंदी मीडियम, तलवार या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
एका मुलाखतीत इरफानने सांगितले होते की, तो लहानपणापासून शाकाहारी आहे. त्याला नॉनव्हेज खाणे आवडत नसल्यामुळे त्याच्या घरातील सदस्य त्याला गमतीने ब्राह्मण म्हणत असायचे. जरी त्याला प्राणी आवडत असले तरी त्याने कधीही मांसाहार खाल्ला नाही.
Irfan Khan Birthday
विशेष म्हणजे इरफान खानने बॉलिवूड मध्ये स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर आपलं नाव कमावलं. राजस्थानमधील टोंक येथे जन्मलेल्या अभिनेत्याने हॉलिवूडमध्ये देखील तितकीच प्रसिद्धी मिळवली होती.
महत्त्वाच्या बातम्या :