Anjali Damania । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन ( Santosh deshmukh murder case ) राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. हत्याप्रकरणातील सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला असून तेथील अनेक अनियमित कामांसंदर्भात सवाल उपस्थित केले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी पंकजा ( Pankaja Munde ) आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी काल सायंकाळी भेट घेतली आहे.
आज माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया ( Anjali Damania ) म्हणाल्या की, “मी लेखी स्वरुपात तक्रार दिली नव्हती. आपण केवळ एसपीसोबत फोनवर बोलून सगळे पुरावे पाठवले होते. पोलिसांनी सर्व पुरावे सायबर सेलकडे देण्याचे सांगितले होते.” त्यामुळे सगळे पुरावे घेत रितसर तक्रार दाखल करायला या ठिकाणी आपण आले असल्याचे दमानिया यांनी सांगितले.
“धनंजय मुंडे मंत्रालयात म्हणाले की ‘आपण राजीनामा दिला नाही आणि देणार नाही’ अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे. अशी भूमिका कुठलाही सज्जन व्यक्ती असता तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असता आणि निष्पक्ष चौकशीसाठी तयार झाला असता. धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील” असेही दमानिया ( Anjali Damania ) यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :