Share

“धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला…”; Sambhajiraje यांचा अजित पवारांना परखड सवाल

“मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय?” असे सवाल संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी केले आहेत.

Published On: 

"धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला..."; Sambhajiraje यांचा अजित पवारांना परखड सवाल

Sambhajiraje । सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलीस आरोपींकडून कसून चौकशी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत.

या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे, असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर काल अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. मात्र अजित पवार यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अद्याप भाष्य केलं नाही. त्यामुळे आता याबाबत त्यांच्याकडून मुंडेंची पाठराखण केली जात असल्याचं दिसतंय. यावर संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी अनेक सवाल केले आहेत.

Sambhajiraje on Ajit Pawar

“मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय?”, असे सवाल संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी केले आहेत.

“अशोक चव्हाण, आर.आर.पाटील यांनी आधी राजीनामा दिला, मग ते पुन्हा सत्तेत आले. तुम्ही सुद्धा तसेच पुन्हा सत्तेवर या. मात्र आता धनंजय मुंडे यांनी मोठ्या मनाने राजीनामा दिला पाहिजे”, असं संभाजी राजे यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही