Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलीस आरोपींकडून कसून चौकशी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह स्थानिक देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत.
अशातच आता सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील ( Bhaiya Patil ) यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासात वाल्मिक कराडला सीआयडीकडून व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांवर सत्ताधारी मंत्री दबाव टाकत असल्याचं देखील भैय्या पाटील यांनी म्हंटल आहे.
“सात दिवस झाले वाल्मिकला ताब्यात घेऊन, काय चौकशी केली आहे?”, असा सवालही त्यांनी केलाय. सुरेश धस नाटकीपणा करून फडणवीसला डिफेंड करत असल्याचं भैय्या पाटील म्हणालेत. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी यावर भाष्य केलंय.
नेमकं काय म्हणालेत भैय्या पाटील?
“मस्साजोग प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव कुठे येऊ नये म्हणून CID काम करत आहे, CID ने वाल्मिकचे फोन अजून जप्त केले नाहीत. वाल्मीकच्या मुलांची चौकशी केली नाही. वाल्मीकला VIP वागणूक CID कडून दिली जात आहे. प्रकरण होऊन आज जवळपास महिना होईल अजूनही वाल्मिकवर मोक्का अन ३०२ लावण्याचे काही प्रयोजन दिसत नाही. सगळे पोलिस वाल्मिकला वाचवत आहेत. पोलिसांवर सत्ताधारी मंत्री दबाव टाकत आहे, अनेक जण मॅनेज केले आहेत. आज सात दिवस झाले वाल्मिकला ताब्यात घेऊन, काय चौकशी केली आहे? तपास २% पण पुढे गेला नाही. वाल्मिकला पुढच्या सुनावणीत जामीन मिळेल असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आता आपण सगळ्यांनी १४ तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेट्स सोबत जेसीबीने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार रहा. सुरेश धस नाटकीपणा करून फडणवीसला डिफेंड करत आहेत अन फडणवीस मुंडे सहित वाल्मिकला वाचवत आहेत”, अशा आशयाचं ट्विट भैया पाटील यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :