Suresh Dhas । बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) हे देखील सहभागी झाले आहेत.
आजच्या आंदोलनात बोलताना त्यांनी आक्रमक पवित्र घेतलेला पाहायला मिळाला. बीडच्या आरोपींना मोक्का लावा आणि त्यांना बिन भाड्याच्या खोलीत ठेवा, असंही सुरेश धस ( Suresh Dhas ) म्हणाले आहेत.
“या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करतोय. यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवलं पाहिजे. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळ कुणालाही त्यांना भेटता आलं नाही पाहिजे. यांना एकटं पडू द्या. आकाची आणि आरोपींची अवस्था ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमान खानसारखी अवस्था झाली पाहिजे”, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :