Dhananjay Munde । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन ( Santosh deshmukh murder case ) राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. हत्याप्रकरणातील सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं सुरु आहेत.
या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे, असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. मात्र राजीनामा देणार नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
या पार्श्वभूमीवर माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर ( Uttamrao Jankar ) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र टीका करत असताना जानकर यांची जीभ घसरली आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) म्हणजे “पुरुष वेश्या” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप जानकर यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले