Share

IPL 2025 साठी सज्ज होत आहेत ‘हे’ नवीन कर्णधार, ज्यांनी भल्या-भल्यांना फोडलाय घाम

by MHD
IPL 2025 साठी सज्ज होत आहेत 'हे' नवीन कर्णधार, ज्यांनी भल्या-भल्यांना फोडलाय घाम

IPL 2025 । गतवर्षी (IPL 2024) केकेआरने (KKR) विजेतेपद पटकाले होते. अशातच आता यंदाचे विजेतेपद कोणता संघ जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा काही संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कोणते आहेत हे संघ? पहा लिस्ट. (IPL)

पंजाब किंग्ज (Punjab Kings)

यावर्षी पंजाब किंग्ज केकेआरकडून विकत घेतलेल्या श्रेयस अय्यरला कर्णधार पदाची जबाबदारी देऊ शकते. श्रेयस बद्दल सांगायचे झाले तर त्याने आयपीएलमध्ये 101 सामने खेळले असून 31.55 च्या सरासरी आणि 125.38 च्या स्ट्राईर रेटने 2 हजार 776 धावा केल्या आहेत. तसेच त्याची 96 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)

लखनऊ सुपर जायंट्सकडून रिषभ पंत आणि निकोलस पुरान कर्णधारपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. संघ पंतला ही जबाबदारी मिळावी, अशी संघाच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

यावेळी दिल्ली कॅपिटल्स नवीन कर्णधारासह मैदानात उतरेल. संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल याला ही जबाबदारी दिली जाईल, असे बोलले जात आहे. या खेळाडूने आयपीएलमध्ये 132 सामने खेळले असून त्याने 4683 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 134.6 राहिला आहे.

कोलकाता नाईट राइडर्स

यंदा संघ स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे किंवा व्यंकटेश अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी देऊ शकतो. फ्रँचायझीने वेंकटेशला २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे तर रहाणे मागील दोन हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आता केकेआरला त्याचा किती फायदा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गुजरात टायटन्स (Gujarat Titans)

पहिल्या हंगामात चॅम्पियन बनलेला संघ गुजरात या वेळी नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे परत गेल्यानंतर संघ नवीन कर्णधार शोधत आहे. गत वर्षी, गिलच्या नेतृत्वाखाली संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. यावेळी संघ रशीद खानला नवीन कर्णधार बनवू शकते.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

देशांतर्गत क्रिकेट खेळत असणारा रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार होऊ शकतो, अशा चर्चा सुरु आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मध्य प्रदेश संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती, पण मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

चेन्नई सुपर किंग्स (CSK)

यंदा चेन्नई सुपर किंग्सने मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद सोपवले आहे. संघाने क्रिकेटपटू एम एस धोनीच्या नेतृत्त्वामध्ये 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. यंदा संघाला विजेतेपद मिळेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मुंबई इंडियन्स (MI)

आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. मागील हंगामात रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधारपद सोपवले होते. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

राजस्थान रॉयल्स (RR)

आयपीएल 2025 मध्ये संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे तो 2021 पासून संघाचा कर्णधार आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावात 20 खेळाडू खरेदी करण्यासाठी संघाने तब्बल 119.70 रुपये खर्च केले आहेत.

IPL 2025 new captain

सनरायझर्स हैदराबाद (SRH) 

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद मैदानात उतरणार आहे. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये संघाने पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले होते.

This year IPL 2025 matches are going to be colorful. Because this year some teams will enter the field with new captains.

Cricket IPL 2025 Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now