Bollywood News । काही अभिनेते तसेच अभिनेत्री अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अनेकजण अभिनय, खाजगी आयुष्य किंवा रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे चर्चेत राहतात. सध्याही अशाच एका अभिनेत्रीची जोरदार चर्चा होत आहे. जिने प्रेमापोटी आपले करिअर धोक्यात घातले होते.
ही अभिनेत्री म्हणजे आयेशा झुल्का (Ayesha Zhulka). आयेशा झुल्का अभिनय आणि तिच्या अफेअर्समुळे चर्चेत आहे. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्री आयेशा आणि प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहली रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी अनाम आणि कोहरा या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते.
त्यांचा साखरपुडा केला असल्याच्या चर्चा होत्या. पण त्यांचं लग्न अर्ध्यावरच मोडलं. यावर तिने एका मुलाखतीमध्ये देखील चर्चा केली आहे. “माझं करिअर चांगलं चाललं होत. तरीही मी सिनेमे साईन करणं बंद केलं होतं. कारण मला लग्न करून संसार थाटायचा होता. त्यावेळी मी अरमानसोबत लग्न करणार होते पण काही कारणास्तव तस होऊ शकले नाही ”
1989 साली ‘कैसे कैसे लोग’ मधून आयेशाने पदार्पण केलं. (Ayesha Zhulka film) त्यानंतर जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’ आणि ‘दिल की बाजी, दलाल, कुर्बान, मेहरबान, बलमा, वक्त हमारा है,रंग,जय किशन, संग्राम अशा अनेक चित्रपटात अभिनेत्रीने काम केले आहे.
आयेशाने 2003 साली आयेशा बिझनेसमन समीर वशीसोबत लग्न केले. या जोडप्याने गुजरातमधील दोन गावं दत्तक घेतली असून तेथील ते 160 मुलांचा संगोपनाचा आणि शिक्षणाचा खर्च करत आहेत. रिपोर्टनुसार, आयेशाची एकूण संपत्ती 82 कोटी आहे. तिचा मुंबईत स्पा आणि सलून बिझनेस आहे. शिवाय ती कपड्यांच्या व्यवसायात देखील उतरली आहे. तिच्या क्लोदिंग ब्रँडचं नाव Additions असून गोव्यात देखील तिचं बुटिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :