Share

“अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे का?”; Nilesh Lanke म्हणाले…

"अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे का?"; Nilesh Lanke म्हणाले...

Nilesh Lanke । राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला असून मोठा भूकंप होण्याची शकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षाला पुन्हा एकदा सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तब्बल सात खासदारांना संपर्क साधल्याची माहिती आहे.

सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) सात खासदारांची भेट घेवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची ऑफर नाकारली आहे. यावर आता निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं.

निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी म्हटलं की, “मी असो किंवा आमच्या बाकीच्या खासदारांबरोबर अद्याप अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही सर्व खासदार एकसंघ आहोत. आमच्याकडून पक्षाला कधीही दगाफटका होईल असं आम्ही काही करणार नाहीत. राजकारणात सर्व गोष्टींना सामोरं जावं लागण्याची तयारी ठेवावी लागते.”

पुढे ते म्हणाले, “हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो बोलतो मात्र राजकीय चर्चा झालेली नाही. कुठलीही ऑफर आलेली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही. अधिवेशन काळात हाय बाय नमस्कार झाला. सुनील तटकरेंना भेटलो नसून खासदार देखील भेटले नाहीत.”

महत्वाच्या बातम्या :

सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) सात खासदारांची भेट घेवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. यावर आता निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now