Share

शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली?; Rohit Pawar म्हणाले…

शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली?; Rohit Pawar म्हणाले...

Rohit Pawar | शरद पवार यांच्या गटात फूट पडल्यानंतर अजितदादांनी काकांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फारसे यश मिळाले नाही. त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. मात्र, विधानसभा निवडणूकीत अजित पवार गटाला चांगलेच यश मिळाले आहे.

मात्र केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी शरद पवार गटातील सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू असल्याचं समोर येतंय. तशा ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना दिल्या आहेत अशी माहिती आहे. आता याबद्दल आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे.

“संसदेचं अधिवेशन सुरु होतं, तेव्हा सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. पण आमचे खासदार असा कोणताही निर्णय घेतील असं आपल्याला वाटत नाही”, असं रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

“सुनील तटकरे हे त्यांच्या त्यांच्या पातळीवर डील करत असावेत. कारण अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख असले तरी सुनील तटकरे यांचा त्यांच्या पक्षात जास्त हस्तक्षेप चालतो. त्यामुळे जोपर्यंत अजित पवार यासंदर्भात कोणतंही वक्तव्य करत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही वक्तव्यावर खरं समजलं पाहिजे असं मला वाटत नाही”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

“संसदेचं अधिवेशन सुरु होतं, तेव्हा सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. पण आमचे खासदार असा कोणताही निर्णय घेतील असं आपल्याला वाटत नाही”, असं रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now