CIDCO । आपलंही हक्काचं घर असावं ,असं प्रत्येकाला वाटत असतं. पण खरंतर या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे अनेकांना त्यांच्या घराची इच्छा पूर्ण होत नाही. पण आता तुम्ही तुमचे स्वप्नातले घर खरेदी करू शकता.
कारण आता सिडकोने (CIDCO Lottery) नवी मुंबईतील 67,000 घरांपैकी 26,000 परवडणाऱ्या घरांची (CIDCO home price) घोषणा केली आहे. यामध्ये वाशी, पनवेल, खारघर, तळोजा, मानसरोवर, बामणडोंगरी, खारकोपर, खांदेश्वर आणि कळंबोली येथील पसंतीच्या घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या आहेत. नोंदणीसाठी तुम्ही https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन तुमचे घरकुलाचे स्वप्न सत्यात उतरवू शकता. (CIDCO Home)
अर्ज दाखल करण्यासाठी तिसऱ्यांदा वाढ केली असून जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे अवघ्या दोन दिवसांचा वेळ आहे. कारण या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2025 आहे.
गट EWS (आर्थिक दुर्बल घटक)
तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो – 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
कळंबोली बस डेपो – 41.9 लाख
CIDCO Home Lottery
अल्प उत्पन्न गट एलआयजी
पनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट – 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख
महत्त्वाच्या बातम्या :