Pune Crime | पाषाण भागातील एका प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रूममध्ये ड्रेस बदलण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( video recording of girls in changing room of pune school ) या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शाळेतील शिपायाला अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार 6 जानेवारी रोजी घडला असल्याची माहिती समोर येतेय. शाळेतील क्रीडा वर्ग संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेच्या स्वयंपाकघरातील खोलीत ड्रेस बदलण्यासाठी गेल्या होत्या. शाळेचा शिपाई तुषार सरोदे हा देखील तिथं होता. विद्यार्थ्यांनी त्याला तिथून जाण्यास सांगताच त्याने मोबाईलचा कॅमेरा चालू ठेवून खोलीतील स्वीच बोर्डवर ठेवला.
shocking incident took place in a famous school in Pashan area of Pune.
हा सगळा प्रकार विद्यार्थिनींच्या लक्षात आला आणि त्यांनी मोबाईलवरून व्हिडिओ लगेच डिलीट केला. विद्यार्थ्यांनी पालकांना हा संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. यावेळी सरोदे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही बाब नाकारली.
मात्र शाळा व्यवस्थापनाला ही बाब समजताच त्यांनी पुन्हा सरोदे यांची चौकशी केली असता त्यांनी आपला मोबाईल फक्त रेकॉर्डिंगसाठी वापरल्याचे मान्य केले. यानंतर शाळा प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून सरोदेला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि POCSO कायद्याच्या कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News: School Peon Arrested For Recording Videos of Girl Students in Changing Room
महत्वाच्या बातम्या :