Laxman Hake । मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) विरुद्ध ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आता हेच दोन्ही नेते मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून आमनेसामने आले आहेत. (OBC vs Maratha)
“मंत्री धनंजय मुंडे निवडून येऊ नये म्हणून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रयत्न केले. अजूनही ते मुंडे मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. आम्ही ओबीसींनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे, मुख्यमंत्री पण आम्हीच केलं आहे,” असा दावा लक्ष्मण हाके यांनी बोलताना केला आहे.
“एक नेता आंदोलनामुळं अपघातानं जन्माला आला आहे आणि त्याने घरात घुसून मारू असं वक्तव्य केलं. जरांगेचं वजन 35 किलो अन् म्हणतोय घरात घुसुन मारेन. आम्ही गेली 10 दिवस सहन करत होतो. संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं जात आहे. निवडणूक असताना एक भाषा आणि निवडून आल्यावर एक भाषा असते,” अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी जरांगेंचा समाचार घेतला आहे.
Laxman Hake vs Manoj Jarange Patil
दरम्यान, हाके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून केलेल्या विधानावर जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे विरूद्ध लक्ष्मण हाके असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यावर जरांगे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- “राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार”; Suresh Dhas यांचा रोख कुणाकडं?
- Suresh Dhas म्हणतात, राष्ट्रवादीच्या बड्या मुन्नीची सुन्नी करणार; राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण? चर्चांना उधाण
- Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! शाळेतल्या शिपायानं केलं विद्यार्थिनींच्या चेंजिंग रूममधील व्हिडिओ रेकॉर्डिंग, अन…
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले