Sarangi Mahajan । बीडच्या मस्साजोगचे सरसपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे, असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. अशातच आता दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन ( Sarangi Mahajan ) यांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
त्या म्हणाल्या, “माझी जमीन धनंजय मुंडे आणि त्याच्या माणसांनी हडप केली आहे. गोविंद मुंडे हा त्याच्या घरचा नोकर आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला धाक दाखवून त्याने माझी जमीन हडप केली. कोऱ्या कागदांवर, १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर सह्या घेतल्या आणि त्या देत नाही तोपर्यंत परळी सोडू देणार नाही असा धाक दाखवला.”
साडेतीन कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली जमीन २१ लाख रुपयांना विकून त्याचे पैसे आल्यानंतर मला हा सगळा घोटाळा समजला. माझी जमीन मला दाखवलीच नाही. १५ दिवसांनी जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्याचा सातबारा बदलून टाकला होता. जो नियमाने १५ दिवसांनी बदलतो. ज्यांना जमीन विकली ते लोकही मला ठाऊक नव्हते, यामध्ये वाल्मिक कराडचा देखील हात असू शकतो, असंही सारंगी महाजन म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :