Santosh Deshmukh । एकीकडे मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील (Santosh Deshmukh murder) आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत तर दुसरीकडे याप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. नुकतीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती.
पोलिसांना आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल सापडला नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. यावर पर्याय म्हणून पोलिसांनी आता विष्णू चाटेचे व्हॉईस सॅम्पल घेतले आहेत. या व्हॉईस सॅम्पलमधून मोठा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच फक्त विष्णू चाटेच नाही तर या प्रकरणी अन्य एक आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे देखील व्हॉईस सॅम्पल घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप विष्णू चाटेवर असून याबाबत त्याचा व्हॉईस सॅम्पल घेतला आहे.
Santosh Deshmukh murder case update
यावरून आता विष्णू चाटेने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली होती? विष्णू चाटे आणि पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांमध्ये नेमके काय बोलणे झाले? याची माहिती लवकरच समोर येईल.
महत्त्वाच्या बातम्या :