🕒 1 min read
Suresh Dhas । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या ( Stantosh Deshmukh murder case) प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे, तर या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेचा सीआयडीकडून तपास सुरु आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी देखील स्थापन करण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण सुरु असल्याचं हाके म्हणालेत. मनोज जरांगे आणि सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
तसेच वाल्मिक कराडला यामध्ये अडकवलं जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनाच ‘एसआयटी’च प्रमुख बनवा असं म्हणत त्यांनी धस यांना टोला लगावला आहे.
“मंत्री धनंजय मुंडे निवडून येऊ नये म्हणून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रयत्न केले. अजूनही ते मुंडे मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. आम्ही ओबीसींनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे, मुख्यमंत्री पण आम्हीच केलं आहे,” असा दावा लक्ष्मण हाके यांनी बोलताना केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- सुरेश धसांवरील आरोपांबाबत Amol Mitkari यांची भूमिका ठाम; म्हणाले “आरोप खोटे असतील तर…”
- “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन…”; Sarangi Mahajan यांचा खळबळजनक दावा
- एक चूक अन् लाखोंचा गंडा; Online Fraud पासून वाचायचं असेल तर ‘या’ गोष्टी टाळाच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










