Sanjay Raut । मात्र केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी शरद पवार गटातील सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू असल्याचं समोर येतंय. तशा ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना दिल्या आहेत अशी माहिती आहे.
अजितदादा पवार यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी देखील हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटातील खासदारांना ‘बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला’ असा सल्ला दिला होता, अशी माहिती समोर आली. यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा खळबळ माजली असून त्यावरून सुप्रिया सुळें, रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत यावर भाष्य केलं आहे. दरम्यान याबाबत बोलताना संजय राऊत यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.
अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळालं ते शरद पवार यांच्यामुळे मिळालं. त्यांची आजा बाजारात जी किंमत आहे, ती शरद पवार यांनी केली, असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणालेत.
Sanjay Raut on Sunil Tatkare
“जसं आमच्याकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे 40 चोर गेले, त्यांची किंमत ही शिवसेना, मा. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहे. त्यामुळे ‘बाप आणि लेकीला सोडा, आमच्यासोबत या’ ही भाषा वापरणं अतिशय अमानुष आहे”, असं म्हणत त्यांनी तटकरेंना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्घृण-अमानुष असतील, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :