Dhananjay Munde । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे महायुती असूनही राज्यातील भाजप नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडावे, अशी मागणी सध्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकदेखील करू लागले आहेत.
याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांनी अमित शाह यांच्याकडे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे मंत्रिपद वाचवण्यासाठी साकडे घातल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे दररोज वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. याच कारणास्तव राज्यातल्या सरकारवर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी दबाव वाढत चालला आहे.
Ajit Pawar meets Amit Shah in Delhi
याच पार्श्वभूमीवर अमित शाह आणि अजित पवार यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार यांच्या दिल्लीतील भेटीविषयी बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. यावर आता अमित शाह काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :