Share

मविआमध्ये धुसफूस सुरूच? Uddhav Thackrey यांनी दिला स्वबळाचा नारा? आज होणार महत्त्वपूर्ण आढावा

by MHD
मविआमध्ये धुसफूस सुरूच? Uddhav Thackrey यांनी दिला स्वबळाचा नारा? आज होणार महत्त्वपूर्ण आढावा

Uddhav Thackrey । विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला. विधानसभेनंतर आता राज्यात मुंबई महापालिका निवडणुकांचे (Mumbai Municipal Elections 2025) वारे वाहू लागले आहे. सर्व पक्ष त्यासाठी जोमाने तयारीला लागले आहेत.

कारण सर्व पक्षांसाठी ही लढत प्रतिष्ठेची असणार आहे. पण याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ठाकरे गट मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढू शकतो. कारण शिवसैनिकांकडून काँग्रेससह (Congres) नाही तर स्वबळावरच ही निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याबाबतचा अहवाल उद्धवसेनेच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतला आहे.

नुकतीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक यांच्यासोबत बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेतला आहे. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Municipal Elections

दरम्यान, आज उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत. त्यामुळे आता आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

Meanwhile, Uddhav Thackrey will also review 6 assembly constituencies in South Mumbai today. So now after reviewing it, it becomes important to see what decision Uddhav Thackeray takes.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD