IPL 2025 । अवघ्या काही महिन्यांवर IPL येऊन ठेपली आहे. संघ आतापासूनच तयारीला लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) गतवर्षी विजेतेपद जिंकले होते. पण अशातच आता आरसीबीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीबाबत (Virat Kohali) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विराट कोहलीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. जर संघ प्लेऑफमध्ये गेला नाही तर कोहली काउंटी क्रिकेट खेळू शकतो. आयपीएल 2025 चा अंतिम सामना 25 मे रोजी होणार असून भारत-इंग्लंडची पहिली कसोटी 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होईल.
पण जर आरसीबीने आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला, तर विराट कोहलीकडे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी केवळ दोन आठवडे शिल्लक असणार आहेत. असे झाले तर त्याला काउंटी क्रिकेट (County Cricket) खेळता येणार नाही. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.
Virat Kohli Return Domestic Cricket
त्यामुळे आता आरसीबी अंतिम फेरी गाठतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, आरसीबीने आयपीएल 2025 साठी 21 कोटी रुपये मोजून विराट कोहलीला कायम ठेवले. यामुळे त्याला आयपीएल 2025 चा पाचवा सर्वात महाग खेळाडू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :