Share

“कोणाला तिकडे जायचे असेल तर…”; Jayant Patil आपल्याच नेत्यांवर भडकले

पहिल्या रांगेत बसलेले अनेकजण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत, असं म्हणत जयंत पाटील हे ( Jayant Patil ) आपल्याच नेत्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.

Published On: 

"कोणाला तिकडे जायचे असेल तर..."; Jayant Patil आपल्याच नेत्यांवर भडकले

Jayant Patil । शरद पवार यांच्या गटात फूट पडल्यानंतर अजितदादांनी काकांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फारसे यश मिळाले नाही. त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील सुप्रिया सुळे यांनी पराभव केला. मात्र, विधानसभा निवडणूकीत अजित पवार गटाला चांगलेच यश मिळाले आहे.

मात्र केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी शरद पवार गटातील सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू असल्याचं समोर येतंय. तशा ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना दिल्या आहेत अशी माहिती आहे.

आता याबद्दल शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी आपल्याच गटातील नेत्यांना सुनावलं असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटाच्या बैठकीत ते बोलत होते. पहिल्या रांगेत बसलेले अनेकजण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत, असं म्हणत जयंत पाटील हे आपल्याच नेत्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कोणाला तिकडे जायचे असेल तर त्यांनी जरूर जावं, असंही जयंत पाटील म्हणालेत.

Rohit Pawar on Sunil Tatkare

“सुनील तटकरे हे त्यांच्या त्यांच्या पातळीवर डील करत असावेत. कारण अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख असले तरी सुनील तटकरे यांचा त्यांच्या पक्षात जास्त हस्तक्षेप चालतो. त्यामुळे जोपर्यंत अजित पवार यासंदर्भात कोणतंही वक्तव्य करत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही वक्तव्यावर खरं समजलं पाहिजे असं मला वाटत नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही