Share

मराठा VS OBC वाद चिघळवून, गुन्हेगारांना अभय देऊन देवेंद्र फडणवीस एन्जॉय करत आहेत?

by MHD
मराठा VS OBC वाद चिघळवून, गुन्हेगारांना अभय देऊन देवेंद्र फडणवीस एन्जॉय करत आहेत?

OBC । मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज (Maratha vs OBC) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. तसेच कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे दोन्ही समाज आमनेसामने आल्याचेही आपण पाहत असतो.

अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सडकून केली आहे. “एरवी DPला औरंगजेबाचा नुसता फोटो बघून कारवाई करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वपक्षीय आमदारांनी राज्यपालांकडे तक्रार केली तरीही त्यावर कोणतीच कारवाई करत नाही,” अशा आशयाचे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “एकाच वेळी मराठा विरुद्ध ओबीसी वाद चिघळवणे आणि त्याच वेळी घटकपक्षातील गुन्हेगारांना अभयही देणे, फडणवीस हा तणाव एन्जॉय करत आहेत का?” असा परखड सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वर्तुळात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sushma Andhare on Devendra Fadnavis

सुषमा अंधारे यांच्या जहरी टीकेमुळे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष कशाप्रकारे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच मराठा समाजाचे नेते नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) देखील काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Leader of Maratha community leader Manoj Jarange Patil and leader of OBC community Prof. What is the reaction of Lakshman Hake too? Everyone is paying attention to this.

Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now