Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
सीआयडीच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग (Ransom call) लागलं आहे. यामध्ये वाल्मिक कराड याने दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन आणि हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिली आहे. आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या फोनमध्ये हे रेकॉर्डिंग झाले आहे.
दरम्यान, कराडने 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटेच्या फोनवरून हा कॉल केला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याचदिवशी सुदर्शन घुले आवादाच्या साईटवर पोहचला होता. त्यामुळे आता कराडच्या वॉइस सॅम्पलची आणि त्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी करण्यात येणार आहे.
Walmik Karad Ransom Call
वाल्मिक कराड याच्या कारनाम्यावरून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आक्रमक भूमिका घेत आहेत. अशातच आता त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. नव्या कॉल रेकॉर्डिंगने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :