IPL 2025 । मागील वर्षी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ला IPL मध्ये (IPL 2024) विशेष अशी कामगिरी करता आली नाही. गतवर्षी केकेआरने (KKR) विजेतेपद पटकावले होते. पण यावर्षी संघ विजेतेपद मिळवू शकतो, असे बोलले जात आहे. कारण संघामध्ये असे काही स्फोटक खेळाडू आहेत, जे संघाला ट्रॉफी मिळवून देऊ शकतात.
हे खेळाडू ठरतील फायदेशीर
ट्रेंट बोल्ट
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राजस्थान रॉयल्सनंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्ससाठी खेळण्यास सज्ज आहे. मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल मेगा लिलावात 12.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर त्याच वेळी दक्षिण आफ्रिका 20 लीगमधील बोल्ट मुंबई इंडियन फ्रेंचायझी टीम MI कॅपेटउनकडून खेळत आहे आणि सामन्यात त्याने आपली उत्कृष्ट कामगिरी आधीच दाखवली आहे. पहिल्या सामन्यात ट्रेंट बोल्टने 3 षटकांत 16 धावांसाठी 2 विकेट्स धावा केल्या.
जसप्रीत बुमराह
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा देखील मुंबई इंडियन्समधील एक महत्त्वाचा दुवा आहे. विशेष म्हणजे तो बर्याच दिवसांपासून मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाबरोबर खेळल्या गेलेल्या बॉर्डर गॅव्हस्कर ट्रॉफीमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे त्याचा फायदा संघाला नक्कीच होईल.
रयान रिकेल्टन
मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज रयान निकेल्टन (Ryan Rickelton) याला आयपीएल मेगा लिलावामध्ये 1 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तर त्याच वेळी, या खेळाडूने पाकिस्तानबरोबर खेळलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत चमत्कार केले होते. या मालिकेत त्याने आपल्या कारकीर्दीचे पहिले दुहेरी शतक झळकावले होते. आता हे खेळाडू आयपीएल 2025 मध्ये प्रवेश करण्यास तयार असून नक्कीच ते सहाव्यांदा संघाला ट्रॉफी मिळवून देतील.
IPL 2025 Mumbai Indians
तिलक वर्मा
मुंबई इंडियन्ससाठी तिलक वर्मा (Tilak Verma) बर्याच दिवसांपासून खेळत आहे. मेगा लिलावात संघाने त्याला 8 कोटी रुपयांना राखून ठेवले. टी 20 मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चौथ्या सामन्यात तिलक वर्माने 255.32 च्या स्ट्राइक रेटसह 47 चेंडूंवर 120 धावा केल्या होत्या. आता हेच खेळाडू दुसऱ्या संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.