Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असा संशय असणाऱ्या वाल्मिक कराडची पोलिसांकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे. आमदार सुरेश धस (Suresh Dhas), आमदार जितेंद्र आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतर नेतेमंडळी सातत्याने त्याच्यावर निशाणा साधत आहेत. सध्या वाल्मिक कराडबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
वाल्मिक कराड प्रचंड तणावात असून त्याला व्यवस्थित झोप येत नाही. त्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्यांनी औषधोपचार केले. जास्त जागरण आणि तणावामुळे डोळे लाल होऊ शकतात, असं डॉक्टरांनी सांगितले आहे. कराड याने विष्णू चाटेच्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली, असा आरोप केला जात आहे.
Walmik Karad health update
महत्त्वाचे म्हणजे याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहेत. भीतीपोटी कराडची झोप उडाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटला असून पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. परंतु या क्रूर हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :