Share

मोठी बातमी! Santosh Deshmukh हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं मोठं पाऊल

by MHD
Santosh Deshmukh Human Rights Commission decision

Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या (Santosh Deshmukh murder) केल्याने संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. पण याप्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी राज्यभरातून देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत मोर्चे काढले जात आहेत. (Santosh Deshmukh case)

या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाकडे (National Human Rights Commission) धाव घेत हत्येची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी केली होती. सोनवणे यांच्या मागणीची दखल घेत अखेर आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच आयोगदेखील स्वतंत्र चौकशी करणार आहे.

Human Rights Commission decision

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यात दिल्लीची टीम पाठवणार असून याबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निर्णयामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीला वेग येईल, असे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

The Human Rights Commission has taken a big step in the Santosh Deshmukh murder case. It is being said that this will speed up the investigation into the murder case of Santosh Deshmukh.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now