R Ashwin । भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विन नेहमी चर्चेत असतो. त्याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी आजही लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या लक्षात आहे. सोशल मीडियावर (Social media) त्याच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. सध्या त्याच एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. याप्रकरणी मोठा गदारोळ सुरु झाला आहे. (R Ashwin Statement)
“मला वाटले की मी हे बोलावे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर ती एक अधिकृत भाषा आहे,” असे वक्तव्य आर अश्विनने तामिळनाडूमधील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात केले आहे. सध्या त्याचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामुळे त्याच्या या विधानानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
R Ashwin On Hindi Language
आर अश्विनला वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याला त्याच्या या वक्तव्यावरून स्पष्टीकरणही द्यावे लागू शकते. दरम्यान, नुकतीच आर अश्विनने अचानकपणे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत चाहते आणि भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता. निवृत्तीनंतर आता सध्या तो आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :