Rohit Pawar । जर सर्वसामान्यांना मंत्रालयात (Ministry) जायचे असेल तर अनेक अटी-नियमांचा सामना करावा लागतो. कित्येक तास वाट पाहिल्यानंतर त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळतो. पण काल मंत्रालयात अचानक एका आलिशान कारने थेट प्रवेश केला. यावरून या कारची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. हाच मुद्दा धरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत.
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. “काल मंत्रालयात काळ्या रंगाची एक महागडी गाडी आली. ही महागडी गाडी कुणाची? कुणाला भेटायला आले? कोणत्या कामासाठी भेटायला आले? एरवी सर्वसामान्यांची नाकाबंदी करणारी मंत्रालयीन यंत्रणा या महागड्या गाडीची कोणतीही चौकशी न करता आत सोडते. एकंदरीत गाडी मालक महागड्या गाडी सारखा महागडा असेल. लवकरच आपण या महागड्या काळ्या गाडीच्या महागड्या मालकाच्या काळ्या कारनामांचा खुलासा करू,” असे आव्हान रोहित पवार यांनी केले आहे.
Lamborghini in Mantralay
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना भेटण्यासाठी या कारमधून व्यक्ती आली होती, अशा चर्चा सुरु झाल्या आहे. पण यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. दरम्यान, आता या आलिशान कारमध्ये नेमकं कोण होतं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :