Manoj Jarange । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. यावरून धनंजय मुंडे यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
“धनंजय मुंडे चुकीचा पायंडा पाडतोय. गरीबाच्या लेकराला न्याय देण्यासाठी मी आणि माझा समाज बोलतोय. मंत्र्याला नाही बोलायचं तर मग कोणाला बोलायचं? आम्ही आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाही का? धनंजय मुंडे यांचं त्यांना वाचवण्यासाठी षडयंत्र आहे,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
“संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी धनंजय देशमुख वणवण फिरत आहे. पण त्यांनाच पोलीस स्टेशनला जाऊन धमक्या देत आहे. त्या गुंडाला बोलायचं नाही का? तुमचा नेता नाही तो सरकार मधला आहे. यात जातीचा काय संबंध? मी वंजारी, धनगर, दलित, ओबीसीचं नाव घेतलं का? लोक कापायचे आहेत का तुम्हाला? जेव्हा धनंजय देशमुख यांना धमकी दिली, तेव्हा मी धन्या मुंडेचे नाव घेतले,” अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या :