Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या वाल्मिक कराड याने केली असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. पण कराडचा हत्येशी थेट संबंध असणारा एकही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पण आता पोलिसांना कराडविरोधात एक मोठा पुरावा हाती लागला आहे. लवकरच एसआयटी हे पुरावे कोर्टात सादर करणार आहे.
सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यापूर्वी दोन वेळा वाल्मिक कराडशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे या वादानंतर पुन्हा सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडशी संपर्क साधल्याचे एसआयटी तपासातून समोर आलं आहे.
Walmik Karad Trouble in Santosh Deshmukh Case
दरम्यान, यापूर्वी आरोपी विष्णू चाटे याने वाल्मिक कराडचं आपल्या फोनवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं, अशी कबुली दिली होती. यानंतर आता सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला असून एसआयटी हे पुरावे कोर्टात सादर करणार आहे. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :