Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाईंड आहे, असा आरोप सातत्याने केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दररोज या प्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे केले जात आहेत. (Santosh Deshmukh case update)
अशातच आता कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या मुलाचा नवा कांड समोर आला आहे. सुशील कराडने (Sushil Karad) त्याच्या मॅनेजरकडून जबरदस्ती बल्कर ट्रक, कार, प्लॉट आणि सोने ताब्यात घेत त्याला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सुशील कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Complaint against Sushil Karad
दरम्यान, पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर येथे लेखी तक्रार दाखल केली होती. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी त्यांच्या तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही, असे पीडितेच्या वकिलांनी सांगितले. अखेर सुशील कराड त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. येत्या 13 जानेवारीला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले