Uddhav Thackeray । आज माध्यमांशी चर्चा करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गट सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट बसल्याची चर्चा सुरु झाली आहे. अखेर यावर शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे.
“जर त्यांची इच्छा असेल स्वबळावर (BMC Election) जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं. हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसत आहे. हा निर्णय योग्य नाही. शेवटी बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही,” अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.
Jitendra Awhad on BMC Election
मुंबई, ठाणे नागपूरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना संधी कधी देणार? कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याने याचा पक्षवाढीला फटका बसतो, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिले आहे. “अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. व्यक्तिगत पक्षाला संधी मिळत नाही, असं नाही. आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :