🕒 1 min read
मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आयपीएल 2025 मध्ये आपल्या शानदार फॉर्मचं प्रदर्शन सुरूच ठेवलं आहे. 1 मे रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 23 चेंडूत नाबाद 48 धावा ठोकत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.
सूर्यकुमारने सलग 11 आयपीएल सामन्यांत किमान 25 धावा करत आयपीएलमधील एक महत्त्वाचा रेकॉर्ड मोडला आहे. याआधी हा विक्रम 2014 साली रॉबिन उथप्पाच्या नावावर होता, ज्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना सलग 10 सामन्यांत 25 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
Suryakumar Yadav | What even Rohit-Virat couldn’t do, Surya Bhau did; Suryakumar created history
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सूर्याने 208.69 च्या स्ट्राइक रेटने खेळताना 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने जबरदस्त खेळी केली. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे.
सध्याच्या हंगामात सूर्यकुमार यादवने 11 सामन्यांत 67.85 च्या सरासरीने 475 धावा केल्या असून, त्यात तीन अर्धशतकं आहेत. त्याचा स्वतःचा सर्वोत्तम हंगाम म्हणजे 2023 चा असून त्यावेळी त्याने 16 सामन्यांत 605 धावा केल्या होत्या. यंदा केवळ 126 धावांनी तो आपला वैयक्तिक विक्रम मोडू शकतो.
सध्या भारताच्या T20 संघाचा कॅप्टन असलेला सूर्यकुमार यादवचा हा फॉर्म 2026 च्या T20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघासाठी नक्कीच सकारात्मक संकेत देतो.
महत्वाच्या बातम्या –
- Sanjay Dutt | ‘तिच्या आई-वडिलांमुळे आमचा संसार मोडला…’, घटस्फोटावर संजय दत्तचं मोठं वक्तव्य
- अंबानी कुटुंबातील लाडका कुत्रा ‘हॅपी’चे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट्स
- संजय दत्तच्या ‘द भूतनी’ चित्रपटात हॉररपेक्षा कॉमेडी अधिक, काय आहे चित्रपटाची कथा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












