🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा मलिकच्या (Neha Malik) घरात तब्बल 34 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणात तिच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीण शहनाज शेख हिच्यावर आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती सध्या फरार आहे.
नेहाच्या चार बंगला येथील निवासस्थानी ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. त्यावेळी नेहाची आई मंजू मलिक या प्रार्थनेसाठी गुरुद्वारात गेल्या होत्या. घरात केवळ शहनाज उपस्थित होती. दुसऱ्या दिवशी ती कामावर न आल्यामुळे तिच्यावर संशय बळावला. मंजू यांनी कपाट तपासले असता दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्वरित पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
Neha Malik House Robbed: ₹34 Lakh Worth Jewellery Stolen
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहनाजने घराच्या साफसफाईच्या दरम्यान ही चोरी केली असावी. नेहाचे दागिने ज्या ड्रॉवरमध्ये ठेवले जात होते, त्याची तिला माहिती होती. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
नेहा मलिक ही पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 4 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती फॅशन, लाइफस्टाइल आणि म्युझिक व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राजकारण्यांनी आमच्या वेदनांवर राजकारण करू नका; दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची विनंती
- वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक शतकावर सचिन, युवराज, शमी आणि युसुफ पठानकडून कौतुकाचा वर्षाव
- वैभवच्या ऐतिहासिक शतकानंतर वडिलांकडून राहुल द्रविड आणि राकेश तिवारी यांचे आभार
- रोहित शर्माकडून वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकाला ‘क्लास’ची
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now