Share

राजकारण्यांनी आमच्या वेदनांवर राजकारण करू नका; दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबाची विनंती

Santosh Jagdale wife, who lost her husband in the Pahalgam attack, makes an emotional appeal to politicians to stop playing with victims’ emotions.

Published On: 

Santosh Jagdale Wife Appeals to Politicians: “Please Don’t Play with Our Pain”

🕒 1 min read

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जगदाळे ( Santosh Jagdale ) कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये पती गमावलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. “दहशतवाद काय असतो, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे, अनुभवलं आहे. त्यामुळे आमच्या वेदनांवर राजकारण न करता माणुसकीने वागा,” अशी त्यांनी राजकारण्यांना विनंती केली.

“पहलगाममध्ये ( Pahalgam Attack ) आम्ही भयंकर स्थिती अनुभवली आहे. डोळ्यांसमोर माणसे मारली जात होती. आम्ही अजूनही त्या धक्क्यातून सावरलेलो नाही. रात्री अडीच वाजता दचकून उठते, भीतीने जीव घाबरतो. तरीही काहीजण आमच्या भावनांवर राजकारण करतात,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Santosh Jagdale Wife Appeals to Politicians: “Please Don’t Play with Our Pain”

तसेच, संतोष जगदाळे यांच्या पत्नीने सांगितले की, लहान मुलांनीही तेच अनुभव सांगितला आहे. “एक माणूस खोटं बोलतो म्हणता येईल, पण सगळे लोक खोटं बोलत नाहीत,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

महाराष्ट्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत व सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष जगदाळे यांच्या कन्या असावरी जगदाळेला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Pune Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या