🕒 1 min read
पुणे – शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली असताना, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यात युती होण्यास संजय राऊत अडथळा ठरत आहेत.”
पुण्यात एका वृत्त वाहिनीशी बोलताना महाजन म्हणाले, “संजय राऊत ( Sanjay Raut ) वारंवार अशा प्रकारची विधानं करतात, जी युतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. त्यांच्या वागण्यामुळेच ही युती शक्य होत नाही.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Sanjay Raut Blocking Raj Thackeray -Uddhav Alliance
शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्व आणि मराठी अस्मिता ही समान भूमिका असूनही अनेक वर्षांपासून युती झाली नाही. प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन नेते एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंच्या युद्धविरोधी भूमिकेवर कार्यकर्ते बुचकळ्यात; मनसे समर्थकांना मानसिक दुःख
- डोनाल्ड ट्रम्पचा भारताला झटका, भारतात iPhone फॅक्टरी नको, अमेरिकेतच उत्पादन वाढवण्याचे आदेश
- हेड कॉन्स्टेबलना मिळाले गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार; गृह विभागाचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











