🕒 1 min read
नवी दिल्ली, २८ एप्रिल: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याने संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने मोठे विधान करत भारतीय लष्कर आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.
शाहिद आफ्रीदीने म्हटले, “जम्मू-कश्मीरमध्ये जर एखादा फटाका फुटला तरीही पाकिस्तानवर आरोप केला जातो. तुमच्याकडे ८ लाख सैनिक असूनही जर अशा घटना घडत असतील, तर याचा अर्थ तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात, कारण. भारतीय लष्कर आणि सरकारने सुरक्षा देण्यात अपयश आले आहे.” असे म्हणत त्याने थेट भारतीय सुरक्षेवर आणि प्रशासनावर सवाल उपस्थित केला.
Shahid Afridi Calls Indian Army Incompetent After Pahalgam Terror Attack
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आफ्रीदीचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय लष्कराच्या कार्यक्षमतेवर केलेल्या टीकेमुळे सोशल मीडियावरही आफ्रीदीवर टीकेची झोड उठली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांच्या तंबीनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नरमले; व्यक्त केली जाहीरपणे दिलगिरी
- पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावात वाढ; इरान, सौदी आणि अमेरिकेची एन्ट्री
- महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा “सेवा हक्क दिन”