🕒 1 min read
नवी दिल्ली, २७ एप्रिल: जम्मू काश्मीरमधील पहलगाम ( Pahalgam Terror Attack ) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावर्ती तणाव अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून, इरानने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
इरानचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास यांनी सोशल मीडियावरून दोन्ही देशांना शांततेची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तान आमचे शेजारी देश आहेत आणि आमच्याशी त्यांचे दीर्घकालीन सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे.”
Pahalgam Terror Attack: Iran, Saudi Arabia, US Urge India-Pakistan to Ease Tensions
याआधी सौदी अरेबियानेही भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली होती. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. एस. जयशंकर यांनी स्वतः ट्विटरवरून या संवादाची माहिती दिली.
दरम्यान, अमेरिकेनेही या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना जवळचे मित्र संबोधून, तणाव कमी करण्यासाठी संवाद साधावा, असे सांगितले. सध्या भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून हालचालींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा “सेवा हक्क दिन”
- पहलगाम हल्ल्याविरोधात शिवसेना आक्रमक; मोदी-शहांच्या फोटोंना बांगड्या दाखवत राजीनाम्याची मागणी
- देश रक्तात न्हालाय, 28 मृत्यूंनंतरही IPL थांबत नाही; टीकेनंतर BCCI चा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now