🕒 1 min read
मुंबई, २७ एप्रिल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तंबीनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) नरमले असून, त्यांनी पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे.
संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस दलावर टीका करताना म्हटले होते की, महाराष्ट्रातील पोलिस खाते हे अत्यंत अकार्यक्षम आहे आणि प्रत्येक नवीन कायद्यामुळे त्यांचा “हफ्ता” वाढतो. त्यांच्या या विधानावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
Sanjay Gaikwad Apologizes After Fadnavis Warning Over Police Remarks
या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत, संजय गायकवाड यांना समज द्यावी आणि आवश्यक असल्यास कारवाई करावी असा इशारा एकनाथ शिंदे यांना दिला होता. यानंतर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले की, “माझा उद्देश संपूर्ण पोलिस दलाला बदनाम करण्याचा नव्हता. माझ्या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित मी विधान केले होते. जर यामुळे पोलिस दलाचा अपमान झाला असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो.”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देखील हस्तक्षेप करत म्हटले की, “कुठल्याही खात्यात काही मोजके लोक चूक करू शकतात, संपूर्ण खात्यावर टीका करणे योग्य नाही. पोलिसांचे धैर्य आणि पराक्रम वाखाणण्यासारखे आहे.”
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावात वाढ; इरान, सौदी आणि अमेरिकेची एन्ट्री
- महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा “सेवा हक्क दिन”
- पहलगाम हल्ल्याविरोधात शिवसेना आक्रमक; मोदी-शहांच्या फोटोंना बांगड्या दाखवत राजीनाम्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now