🕒 1 min read
लखनऊ – IPL 2025 च्या 61व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद ( LSG vs SRH ) आमनेसामने येणार आहेत. सामना लखनऊच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे, जिथे हवामान आणि खेळपट्टी दोघेही संघांच्या रणनीतीवर मोठा प्रभाव टाकणार आहेत.
हवामानाचा अंदाज: लखनऊमध्ये सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. तापमान कमाल ३९ अंश सेल्सिअस तर किमान २८ अंश असण्याची शक्यता आहे. उष्णतेचा फटका खेळाडूंना बसण्याची शक्यता असून, सामन्याच्या दुसऱ्या डावात दव मोठी भूमिका बजावू शकतो.
LSG vs SRH Weather and Pitch Report
खेळपट्टीचा अंदाज (Pitch Report): स्टेडियमवरील खेळपट्टी संथ असून, कमी बाऊन्ससह खेळाडूंना पारंपरिक क्रिकेटिंग शॉट्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे धावसंख्या मोठी उभारणं अवघड आहे. पहिल्या डावातील सरासरी स्कोअर १६७ आहे, आणि दुसऱ्या डावात दवमुळे गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते.
IPL मध्ये एकूण १९ सामने एकाना स्टेडियमवर झाले आहेत.
त्यापैकी ८ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तर १० सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
या मैदानावरील सर्वोत्तम चेस: राजस्थान रॉयल्सने LSG विरोधात १९९/३ (२०२४)
LSG सध्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उरलेले सर्व सामने जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे SRH आधीच स्पर्धेतून बाद झाल्यामुळे, ते विजय मिळवून सन्मानपूर्वक निरोप घ्यायचा प्रयत्न करतील.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: SRH vs LSG सामना – लखनऊचं वरचष्मा कायम, प्लेऑफसाठी महत्त्वाचा टप्पा
- पुण्यात गुन्हे थांबले नाहीत, मग बीडमध्ये काय थांबवणार?” — अजित पवारांवर करुणा मुंडेंचा हल्लाबोल
- गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा पंकजा – धनंजय मुंडेंवर थेट आरोप; ‘बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर चालवा’- करुणा मुंडे