🕒 1 min read
क्रिकेट प्रतिनिधी | IPL 2025 च्या 61व्या सामन्यात लखनौच्या एकाना स्टेडियमवर SRH ने LSG वर 6 विकेट्सनी मात केली. 206 धावांचे लक्ष्य SRH ने केवळ 18.2 षटकांत पूर्ण करत दमदार विजय मिळवला. या पराभवानंतर LSG चे प्लेऑफ्समध्ये जाण्याचे स्वप्नही भंगले.
लखनौकडून मिचेल मार्शने 39 चेंडूंमध्ये 65 धावा करत सुरुवात केली. मार्करमने 38 चेंडूंमध्ये 61 धावांची उत्तम साथ दिली. निकोलस पूरनने फटकेबाजी करत 26 चेंडूंमध्ये 45 धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात संघाने 205/7 असा मोठा स्कोअर उभारला.
SRH च्या गोलंदाजांमध्ये इशान मलींगा याने 2 बळी घेतले. डेब्यू करणाऱ्या हर्ष दुबे, नितीश रेड्डी आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
206 धावांचा पाठलाग करताना SRH चे सलामीवीर आक्रमक पद्धतीने खेळले. अभिषेक शर्माने फक्त 20 चेंडूंमध्ये 59 धावा फटकावल्या. इशान किशनने 35, हेन्रीच क्लासेनने 28 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. कमिंदू मेंडिसने 32 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. शेवटी अनिकेत वर्मा आणि नितीश रेड्डीने सामना जिंकून दिला.
Milestones achieved during LSG vs SRH, Match 61 of IPL 2025
कमिंदू मेंडिस: टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार
हर्षल पटेल: IPL मध्ये 150 बळी पूर्ण
निकोलस पूरन: IPL 2024 पासून सर्वाधिक 71 षटकार
📌 महत्वाच्या बातम्या
- CSK vs RR : सामना दिल्लीतील हवामान आणि खेळपट्टी अहवाल
- CSK vs RR सामना: चेन्नईच्या संभाव्य Playing 11 ची घोषणा
- “जर गद्दारी केली असेल तर मी राजकारण सोडतो”; शिंदे गटाच्या आमदाराचे थेट आव्हान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











